दोन बांगलादेशी महिलांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा

ठाणे – भारतात बेकायदेशीर घुसखोरी करून येथे वास्तव्य केल्याच्या आरोपावरून दोन बांगलदेशी महिलांना येथील स्थानिक न्यायालयाने प्रत्येकी एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्याखेरीज त्यांना पाच हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. मुमतात रसूल शेख वय 45 आणि मुनीरा हुसेन वय 30 अशी या महिलांची नावे आहेत.

या महिलांना स्थानिक पोलिसांनी 15 जुलै 2017 मध्ये मीरा रोड परिसरात अटक केली होती. त्या महिलांनी बेकायदेशीर मार्गाने घुसखोरी करून त्या ठाणे परिसरातील झोपडपट्टीत राहण्यासाठी आल्या होत्या. त्या मजुरीचे काम करीत होत्या. मुंबईच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरीक घुसले असून त्यांना शोधून काढण्याचे जिकीरीचे काम पोलिसांना करावे लागत आहेत.

यातील अनेकांनी रहिवाशी दाखले आणि रेशन तसेच आधारकार्डेही मिळवली असल्याने त्यांच्या विरोधातील कारवाईसाठी पुरावे गोळा करण्याचे काम बिकट बनले आहे. त्यामुळे अशा नागरीकांना न्यायालयात शिक्षा होण्याची अशी प्रकरणे दुर्मिळ मानली जातात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)