दोन फरार आरोपी जेरबंद

पिंपरी – खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन फरार आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या तपासी पथकाने गुरुवारी (दि. 22) मामुर्डी येथे सापळा रचून अटक केली.

राहुल उर्फ पापा नितीन भोसले (वय-30), सॅमसन उर्फ छोटु अँथनी पॉल झेवीयर (वय-26, दोघे रा. साईनगर, मामुर्डी, देहुरोड) अशी त्यांची नावे आहेत.

-Ads-

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. दरम्यान, तळेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी मामुर्डी येथे आले असल्याची माहिती प्रवीण दळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांना जेरबंद करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे,सतिश कांबळे, हर्षल कदम, भीमसेन सांडभोर, संपत निकम, धर्मराज आवटे आदींच्या पथकाने केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)