दोन फरार आरोपीसह एका सराईताला अटक

पिंपरी – गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दोन वेगवेगळ्या गुन्ह्यातील फरार आरोपीसह एका सराईताला अटक केले आहे. तसेच या कारवाईमध्ये पोलिसांनी तीन जिवंत काडतुसांसह देशी बनावटीचे पिस्तूल देखील जप्त करण्यात आले आहे.

सचिन बबन मिसाळ (वय-32, रा. सिल्वर पाम ग्रो सोसायटी, रावेत), संपत कांबळे (वय-19, रा. दळवी नगर झोपडपट्टी, चिंचवड) व बाळू शंकर उबाळे (वय-5, रा. बौद्ध विहार जवळ, ओटास्किम, निगडी) असे अटक आरोपींची नावे आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गुन्हेगाराजवळ पिस्तूल आहे. तो सतत त्याच्यासोबत बाळगतो, अशी माहिती गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला मिळाली. त्यानुसार सिल्वर पाम ग्रो सोसायटीच्या गेटजवळ सापळा रचून सचिन बबन मिसाळ याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल मिळाले. त्यात तीन जिवंत काडतुसे आढळून आली. सर्व ऐवज पोलिसांनी जप्त केला. त्यावरून त्याला अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात पिस्तूल बाळगल्याच्या गुन्हा दाखल आहे. यावरून सचिन याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या विरोधात भारतीय शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईत चिंचवड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यातील आरोपी अद्याप फरार होता. या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. अक्षय संपत कांबळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अक्षय हा दळवीनगर झोपडपट्टीच्या कमानीजवळ येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी सापळा रचून त्याचा पाठलाग करून त्याला अटक केली. पुढील कारवाईसाठी त्याला चिंचवड पोलिसांकडे हजर करण्यात आले.

तसेच निगडी पोलीस ठाण्यातील गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. बाळू शंकर उबाळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याला चिकन चौक ओटास्किम येथून अटक केली असून पुढील कारवाईसाठी निगडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)