दोन पेक्षा अधिक मुले असणाऱ्यांचा मतदान अधिकार काढून घ्यावा- बाबा रामदेव

अलीगड-(उत्तर प्रदेश): दोन पेक्षा अधिक मुले असणारांचा मतदान अधिकार काढून घ्यावा असे स्पष्ट मत योगा गुरू बाबा रामदेव यांनी व्यक्‍त केले आहे. अलीगडमध्ये मीडियाशी बोलताना त्यांनी सांगितले की, ज्यांना दोनपेक्षा अधिक मुले आहेत, त्यांचा मतदानाचा हक्क काढून घेण्याबरोबरच त्यांना निवडणूक लढविण्यावर बंदी घालणे, त्यांचे रेशन कार्ड बंद करणे असे उपाय अशा उपाययोजना त्यांनी सुवविल्या आहेत. त्याचबरोबर सरकारी नोकरी आणि मोफत उपचाराची सवलतीही काढून घ्याव्यात. हिंदू असो वा मुसलमान असो वा अन्य कोणत्या धर्माचा असो सर्वांसाठी या उपाय योजना अमलात आणल्या पाहिजेत असे त्यांनी सांगितले. येथील स्वर्णजयंती नगरात पतंजलीच्या शो-रूमचे उद्‌घाटन करण्यासाठी ते आले होते.

लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी अशा गोष्टी आवश्‍यक आहेत, नाही तर वाढत्या लोकसख्येला आळा बसणार नाही, असे प्रांजळ मत त्यांनी व्यक्त केले आहे. अलीकडच्या काळात बाबा रामदेव यांनी राजकीय मते प्रकट करण्याचे कटाक्षाने टाळत आले आहेत. परंतु प्रियांका गांधी यांची कॉंग्रेसच्या महासचिवपदी नियुक्तीबाबत विचारले असता ते म्हणाले, की तो कॉंग्रेसचा अंतर्गत प्रश्‍न आहे, पण एक आहे, रणांगणावर चांगला योद्धा असेल, तर मुकाबल्याला मजा येते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

योगा गुरू “कॉर्पोरेट’ बनत असल्याची चर्चा चालते, त्याबाबत त्यांना छेडण्यात आले. त्यावर ते म्हणाले, की मी देशसेवा करत आहे. स्वदेशीच्या माध्यमातून 11 हजार कोटी रुपये सेवाकार्यात आल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.

हिंदुत्वाच्या मुद्‌द्‌याबाबत, कलम 370 बाबतच्या फायद्या-तोट्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला पाहिजे, असे स्पष्ट करताना ते “वजीर’ आहेत आणि आम्ही “फकीर’ आहोत अशी मिस्कील टिप्पणी त्यांनी केली आणि जनतेने समजून घेतल्या पाहिजेत असेही सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)