दोन पिढ्यांना जग दाखवणारी “आई’ हरपली

पाथर्डी – आरोग्य माता केंद्राच्या प्रमुख डॉ. मेहरनाज मेहरजी करकरिया उर्फ करकरे मॅडम यांचे शनिवारी (दि.26) रोजी पाथर्डी येथे वृध्दापकाळाने निधन झाले. शेवगाव येथील नित्यसेवा हॉस्पिटलच्या परिसरात त्यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. करकरे मॅडम 75 वर्षाच्या होत्या. गेल्या दोन पिढ्यातील लाखो बालकांना जग दाखवणारी जन्मदात्री म्हणून त्यांची ओळख होती.
अहमदनगर, बीड, आणि औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागातून प्रसूतीसाठी महिला त्यांच्या आरोग्य माता केंद्रात येत होत्या. अत्यंत कमी खर्चात उपचार करून लाखो मातांना आरोग्यदायी मातृत्व त्यांनी दिले. त्यांच्या निधनाने बिड, औरंगाबाद व नगर जिल्हयात हळहळ व्यक्त केली जात आहे. तिन्ही जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहणारे फलक लावण्यात आले आहेत.
डॉ.करकरीया यांनी पुणे येथून वैद्यकीय स्त्रिरोग चिकीत्सेचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या वैद्यकीय सेवेला प्रारंभ केला.
सुमारे दहा वर्ष जालना व पाचोड येथे मिशनरी हॉस्पीटलमध्ये सेवा केल्यावर त्यांनी शेवगांव येथील नित्यसेवा हॉस्पीटलमध्ये सेवा केली. पन्नास वर्षाच्या आपल्या वैद्यकीय सेवेत त्यांनी लाखो बाळंतपणे नैसर्गिक पध्दतीने करुन वैद्यकीय क्षेत्रात मोठा विक्रम नोंदवला आहे. त्या सोबतच कौंटूबीक जाचाने त्रस्त झालेल्या महिलांना रोजगार जगण्याचा आधार व मानसिक बळ देत अनेक महिलांना आत्महत्येपासून परावृत्त केले. प्रसिध्दीचा त्यांना तिटकारा असल्याने त्यांना कधी प्रसिध्दीच्या झोतात स्वत:ला मिरवून घ्यावला आवडले नाही. करकरीया यांचे कार्य वैद्यकीय क्षेत्रासाठी वाळवंटातील पानथळ जागा वाटावी असे होते. इतरांच्या संसारात आनंदाची वेल फुलवण्यात त्यांनी आपला आनंद मानला.
समाजसेवेच्या ध्यासामुळे त्यांनी स्वतःचा संसार उभा केला नाही . त्या अविवाहित राहिल्या. त्यांच्या केंद्रात दररोज सुमारे पंधरा ते वीस बाळंतपणे नैसर्गिक पध्दतीने होत असत. बाळतंपणासाठी तालुक्‍यातील खाजगी, सरकारी, उपजिल्हा रुग्णालये अक्षरश; करकरे बाईंच्या दवाखान्यामुळे ओस पडली होती. आजी, आई व नात अशी तिन पिढ्यांची बाळतंपणे करुन करकरेबाईंनी विश्वास मिळवला होता. त्यांच्या जाण्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. करकरे मॅडमच्या निधनाने ग्रामीण भागातील महिलांमध्ये दुःख व्यक्त केले जात आहे.

अखेरपर्यंत रुग्णसेवा…
पाथर्डी येथे मिशनरीचा आरोग्यमाता केंद्राचा दवाखाना आहे. या दवाखान्याला करकरेबाईंचा दवाखाना म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म 4 डिसेंबर 1945 रोजी सेवाभावी व सुसंस्कृत असलेल्या पारशी कुंटूबात झाला. त्यांनी आपले आयुष्ट संसारीक पध्दतीने न जगता रुग्णसेवा हीच इश्वरसेवा समजून अखरेच्या श्वासापर्यंत रुग्णसेवा केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)