दोन पादचारी महिला ठार

पिंपरी – पुनावळे आणि दिघी येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात रस्ता ओलांडणाऱ्या दोन महिला मृत्युमुखी पडल्या. या दोन्ही घटना मंगळवारी घडल्या.

देहूरोड – कात्रज बाह्यवळण महामार्गावर पुनावळे येथे झालेल्या अपघातात शोभा शिवाजी चव्हाण (वय-54, रा. पुनावळे, ता. मुळशी) यांचा मृत्यू झाला. शोभा या 6 तारखेला सकाळी साडेआठ वाजता कामावर चालल्या होत्या. पायी रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीची त्यांना जोरदार धडक बसली. यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दुचाकीचालक सुधीर रमेश बन्सल (रा. गहूंजे, ता. मावळ) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरा अपघात पुणे – आळंदी रस्त्यावर दिघीतील विठ्ठल मंदिर चौकात झाला. यामध्ये सुरेखा गंगाधर क्रेंद्रे (वय-52, रा. माऊलीनगर, दिघी) या मृत्युमुखी पडल्या. 6 नोव्हेंबर रोजी पहाटे सव्वाचारच्या सुमारास केंद्रे या पायी चालल्या असताना स्वीफ्ट डिझायर मोटारीने त्यांना जोरदार धडक दिली. त्यांना त्वरीत रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दिघी पोलीस तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)