दोन धामण सापांच्या नरांचे अद्भुत युद्ध

जेजुरी – पुरंदर तालुक्‍यात जेजुरी नजीकच्या खोमणे वस्ती येथील ज्ञानेश्वर खोमणे यांच्या घरानजीक शेतात दिसले हे दृश्‍य…खोमणे कुटुंबीयांनी सर्पतज्ञास पाचारण केले सर्पतज्ञ दत्तात्रय मुरकुटे यांनी त्यांना पकडून दूर निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले. याचे वैशिष्ट्‌य म्हणजे हे दोन्ही धामण प्रकारातील नर जातीचे साप आहेत. ते एकमेकांशी युद्ध करताहेत. मात्र एकमेकांना दुखापत किंवा चावा घेत नाहीत. केवळ एकमेकांची ताकद जोखत असतात.

यात थकणारा निघून जातो. विजयी मात्र दुसऱ्याशी असेच युद्ध करण्यास तयार राहतो .मार्च महिन्यात नेहमीच अशी दृश्‍ये दिसतात. एप्रिल महिन्यात मात्र अशा युद्धातून विजयी सर्पाच्या सानिध्यात मात्र मादी येते. त्यावेळी मात्र नर मादीचे जुळे असते. प्रजननाच्या दृष्टीने हे मिलन होत असते. पुढे मे महिन्यात मादी अंडी घालते साधारणपणे 18 ते 22 अंडी धामण घालते. साधारण 65 ते 70 दिवसानंतर अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. धामण जातीचे साप विषारी नसतात. उलट ते शेतकऱ्यांचे मित्र असतात. शेतातील उंदीर खाण्यास ते एक्‍सपर्ट असल्याने त्यांना ‘रॅट स्नेक’ असेही म्हणतात असे वाईल्ड लाईफ प्रोटेक्‍शन व रिसर्च सातारा संस्थेचे वन्यजीव अभ्यासक दत्तात्रय मुरकुटे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)