दोन दिवसात दोन आत्महत्या

पिंपरी – दोन दिवसात दोघांनी आत्महत्या करण्याचा प्रकार पिंपरी-चिंचवड शहरात घडला. एका आयटी अभियंत्याने सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन तर एका विवाहितेने गळफास घेत आपले जीवन संपवले.

पहिल्या घटनेत विद्यानगर पाथा (वय 25, रा. मेगा पोलीस ओसायटी, हिंजवडी, मूळ रा. विशाखापट्टणम) या आयटी अभियंत्याने गुरुवारी (दि. 13) सकाळी साडेसातच्या सुमारास मेगा पोलीस सोसायटीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. पोलिसांनी तात्काळ विद्यासागर याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले.

दुसऱ्या घटनेत विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. साने चौक येथील भीमशक्तीनगर परिसरात शुक्रवारी (दि.14) सकाळी सव्वा नऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दीपाली विकास चव्हाण (वय-26, रा. साने चौक, चिखली) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. दीपाली यांनी छताच्या लोखंडी अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. निगडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)