दोन दिवसात आढळले तीन बेवारस मृतदेह

पिंपरी – शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोन दिवसात तीन बेवारस मृतदेह आढळले आहेत. शनिवारी (दि. 1) पिंपळे गुरवव पिंपरी तर रविवारी (दि. 2) भोसरीत बेवारस मृतदेह आढळला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपुला खाली रविवारी (दि. 2) सायंकाळी पाचच्या सुमारास एका बंद कारमध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला आहे. संबंधीत इसम दररोज तेथे फिरत होता. रोज रात्री तो त्याच कारमध्ये झोपत असे. पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.

शनिवारी (दि. 2) पिंपळे गुरव येथे महादेव मंदिराच्या पाठीमागे पवना नदी पात्रात एक 25 वर्षीय तरुण बेशुद्ध अवस्थेत आढळला त्याला वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी मृत घोषीत केले. याचा तपास सांगवी पोलीस करत आहेत.

याच दिवशी पिंपरी येथील गांधीनगर झोपडपट्टी जवळील जय गणेश वरदहस्त सोसायटीच्या पोर्चमध्ये एक वृद्ध इसम बेशुद्ध अवस्थेत आढळ्याचे पिंपरी पोलिसांना कळाले. त्यानुसार वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी मृत घोषीत केले. तीनही घटनांमधील इसम हे फिरस्ती होते. त्यांच्या जवळ कोणताही पुरावा न सापडल्याने त्यांची अद्याप ओळख पटू शकली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)