दोन दिवसांनंतर येलवाड़ीचा पाणी पुरवठा सुरळीत

देहुरोड- देहू जवळील येलवाडी येथे सार्वजनिक विहिरीवरील मोटारीची विद्युत केबल सोमवार दि. 22 ला मध्यरात्री चोरीला गेल्याने दोन दिवस पाणी पुरवठा बंद होता. कालपासून येलवाडीचा पाणी पुरवठा सुरळीत झाला. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी व महिलांना नाहक त्रास सहन करावा लागला. माजी सरपंच नितीन गाडे, बंटी गाडे, राजेंद्र गाडे, मयूर वाळुंज, बाळू बोत्रे, राजेंद्र बोत्रे, शशिकला घोडके, पंडित गाडे, विनोद गाडे यांनी गावात टॅंकरने पाणी पुरवठा केला. यापूर्वीही दोन वेळा अशी घटना घडली असून त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी केबल लांबवून यांत्रीक मोटारही नादुरूस्त केल्याने दुरुस्तीला विलंब लागला होता, असे ग्रामसेवक पुनम शेवाळे यांनी सांगीतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)