दोन दिवसांनंतर अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू – 454 यात्री रवाना

जम्मू (जम्मू-काश्‍मीर) – दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर अमरनाथ यात्रेला पुन्हा सुरुवात झाली आहे. 454 यात्रेकरूंची तुकडी अमरनाथसाठी रवाना झाली. भगवती नगरहून रवाना झालेल्या आजच्या अमरनाथ यात्रा तुकडीत 63 महिला यात्रेकरूंचा समावेश आहे. फुटीरवद्यांनी पुकारलेल्या दोन दिवसांच्या बंदमुळे रविवारपासून यात्रा स्थगित ठेवण्यात आली होती. जम्मू आणि काश्‍मीरच्या नागरिकांना विशेष अधिकार देणाऱ्या कलम 35 अ च्या वैधतेला दिलेल्या कायदेशीर आव्हानाच्या विरोधात हा बंद पुकारण्यात आला होता.

391 पुरुष आणि 63 महिलांचा समावेश असलेल्या यात्रेकरूंची 36 वी तुकडी आज 11 वाहनांच्या ताफ्याने अमरनाथसाठी रवाना झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. अमरनाथ यात्रेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. 30 महिलांसह 230 यात्रेकरू गंडेरबाल जिल्ह्यातील बालटाल मार्गाने, तर 33 महिलांसह 190 यात्रेकरू नेहमीच्या पहलगाम मार्गे रवाना झाले. पहलगाम मार्गे 33 साधूही यात्रेसाठी रवाना झाले आहेत.
सोमवारपर्यंत 2,74,118 यात्रकरूंनी अमरनाथल जाऊन बाबा बर्फानीचे दर्शन घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)