पुणे- सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनातील 28 आंदोलकांना दोन दिवसांत न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तर, चौघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली असून, पुणे जिल्हा बार असोसिएशने त्यांच्यातर्फे जामिनासाठी अर्ज केला आहे. यावर सत्र न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
एरंडवणा येथील परसिस्टंट येथील मागील गेटची तोडफोड केल्याप्रकरणात डेक्कन पोलिसांनी 9 जणांना अटक करून न्यायालयात हजर केले. या सर्वांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. सय्यद यांनी रविवारी 9 ते 12 वेळेत पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला आहे. तर, कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असलेल्या 8 जणांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तर, चौघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यांच्या जामिनावर सत्र न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान, बुधवारी (दि.15 ऑगस्ट) कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असलेल्या 11 जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. बचाव पक्षातर्फे पुणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुभाष पवार, ऍड. समीर घाटगे, उपाध्यक्ष ऍड. भूपेंद्र गोसावी, ऍड. हेमंत झंजाड, ऍड. विवेक भरगुडे, ऍड. नितीन झंजाड, ऍड. कुमार पायगुडे, ऍड. सौरभ मोरे, ऍड. सागर गायकवाड, ऍड. भारती जागडे, ऍड. विजय शिंदे यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)