दोन दिवसांच्या बंदीनंतर माळशेज घाट सुरू

ओतूर-नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्ग दरडी कोसळण्याची शक्‍यता असल्याने सध्या वाहतुकीसाठी दोन दिवस बंद करण्यात आला होता.
या महामार्गावर एसटी महामंडळाच्या दररोज नगर, औरंगाबाद, ठाणे, भिवंडी, परभणी, बीड, निलंगा या गाड्यांची ये-जा चालू असते. नगर, पुणे व ठाणे या तीन जिल्ह्यांतील वाहतूक सुरू असते. माळशेज घाट सध्या पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय प्रसिद्ध ठिकाण बनले आहे. सतत दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे घाटात दरडी कोसळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबई-विशाखापट्टणम्‌ या राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात दरडी कोसळण्याच्या शक्‍यतेने सावधानता म्हणून पर्यटकांसाठी हा घाट दोन दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती रस्ते बांधकाम प्रशासनाने स्पष्ट केली होती. दोन दिवसाच्या प्रतिक्षेनंतर माळशेज घाट वाहतुकीसाठी सुरू झाला आहे.
राष्ट्रीय महामार्ग 61 हा माळशेज घाट मार्गे नगरकडे जातो. मात्र तीन ते चार दिवस वाढत्या पावसामुळे घाटात दरडी पडण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने सावधगिरी म्हणून शनिवार, रविवार या दोन दिवशी माळशेज घाट बंद केला होता. या दोन दिवशी पर्यटक मोठ्या संख्येने येणार असल्याचे भाकित जाणून घेऊनच माळशेज घाट पर्यटक व वाहनांसाठी बंद केला होता. या दिवसांमध्ये लाखो रुपयांचा व्यवहार टप्प झाला. दूध व तरकारी भाजीपाला महाग झाला होता. आज घाट चालू झाला असून वाहनांची पुन्हा वर्दळ पाहायला मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)