दोन तरुणांना पिस्तूलसह अटक

पिंपरी – भाटनगर येथे देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस यासह दोन तरुणांना अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास भाटनगर येथे पिंपरी पोलिसांनी केली.

विकास कांबळे (वय-28, रा. पत्राशेड, पिंपरी) आणि अमीर उर्फ राजा युसुफ शेख (वय-18, रा. बौद्धनगर, पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

-Ads-

भाटनगर येथे दोघेजण दुचाकीवरून आले असून त्यांच्याजवळ पिस्तूल असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी विकास आणि अमीर यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी करत अंगझडती घेतली असता एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून असा 76 हजार 150 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)