दोन चिमुकल्यांसह पित्याची आत्महत्या

– ताथवडे येथील घटना

पिंपरी – ताथवडे येथे वडिलांनी दोन चिमुकल्यांसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. 18) सकाळी घडली आहे.

-Ads-

दीपक बर्मन (वय-35), शुभम (वय-10) व रुपम दीपक बर्मन (वय-8) अशी मृत पिता-मुलांची नावे आहेत.

बर्मन कुटुंबीय हे मुळचे पश्‍चिम बंगाल येथील राहणार होते. दीपक हे घरा जवळच असलेल्या सनसिंग ऑटो प्रॉडक्‍ट या वायरींग कंपनीत कामाला होते. ते कामावर न आल्याने त्यांचे सहकारी कामगार त्यांच्या घरी चौकशीसाठी आले असता त्यांना घर बंद दिसले. त्यामुळे ते निघून गेले. थोड्या वेळाने दीपक यांची पत्नी कामावरुन परतल्या असता दरवाजा उघडताच त्यांना तिनही मृतदेह दिसले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून वाकड पोलीस तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)