दोन गावठी पिस्तूलासह चार काडतूस जप्त

भिवरीत एकास अटक : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोणी काळभोर- भिवरी, सासवड – कोंढवा रोड (ता. पुरंदर) येथून एकास बेकायदेशीर दोन गावठी पिस्टल व चार काडतुसांसह ताब्यात घेतल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
लोकसभा निवडणूक 2019 चे अनुषंगाने पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार, फरारी आरोपी पकडण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यासाठी पथके नेमण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना आदेश दिले होते. त्याप्रमाणे दि. 14 मार्च रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेले पोलीस उपनिरीक्षक रामेश्‍वर धोंडगे, दिलीप जाधवर, मोरेश्‍वर इनामदार, जगदीश शिरसाट, राजू चंदनशिव, महेश गायकवाड, निलेश कदम, राजेंद्र पुणेकर, गणेश महाडिक, बाळासाहेब खडके, प्रमोद नवले यांच्या पथकास सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत मौजे भिवरी, सासवड-कोंढवा रोड, हॉटेल रुद्राशेजारी (ता. पुरंदर) येथे एक इसम गावठी पिस्टलची विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला. त्यावेळी ज्ञानेश्‍वर संपत मोमीन (वय 20 वर्षे, रा. धायरीफाटा, ता. हवेली) यास बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेले 2 गावठी मॅगझिनचे पिस्तूल व 4 जिवंत काडतुसे असा 1 लाख चारशे रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. आरोपीस पुढील कारवाईसाठी सासवड पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले. त्याच्याविरुद्ध आर्म ऍक्‍ट कलम 3, 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने हे पिस्टल कोणाकडून आणले? त्याचे आणखीन कोणी साथीदार आहेत काय? याबाबतचा अधिक तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)