कराची – पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात एका चर्च बाहेर दोन ख्रिश्‍चन नागरीकांच्या हत्या करण्याचा प्रकार घडला असून या हत्येच्या निषेधार्थ येथील ख्रिश्‍चन नागरीकांनी येथे जोरदार निदर्शने केली. काल चर्च मध्ये प्रार्थनेसाठी आलेल्या या नागरीकांवर मोटारसायकलवरून आलेल्या चार अज्ञात इसमांनी गोळीबार करून त्यांना ठार मारले होते.

या गोळीबारात अन्य सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. इस्लामिक स्टेटच्या गनिमांनी या हत्या केल्याचा आरोप आहे. या हत्या प्रकरणामुळे बलुचिस्तान प्रांतातील अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारने अल्पसंख्य समुदायाला पुरेसे संरक्षण द्यावे अशी मागणी या निदर्शकांनी केली. क्वेट्टा शहरातील ख्रिश्‍चनांनाही जीविताचा धोका निर्माण झाला असून त्यांच्या बाबतीत सरकारने तातडीने पावले उचलून त्यांना संरक्षण दिले पाहिजे अशी मागणी या निदर्शकांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)