दोन कोटी रोजगार देऊ, अशी भाषा करणाऱ्यांनी दीड कोटी लोकांचे रोजगार गिळले- भुजबळ 

मुंबई: महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी रोज रडतोय, कांदा रस्त्यावर फेकतोय आणि सरकार पाकिस्तानमधून कांदा आणत आहे. ऐनवेळी हे पाकिस्तानला शिव्या घालतात मग यांना पाकिस्तानचा कांदा कसा गोड लागतो? असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भिवंडी येथील परिवर्तन सभेत सरकारला धारेवर धरले. बेरोजगारांना रोजगार तर मिळाला नाही, मात्र ज्यांच्याकडे रोजगार होता त्यांचाही रोजगार सरकारने हिरावून घेतला आहे. दोन कोटी रोजगार देऊ, अशी भाषा करणाऱ्या भाजप सरकारने दीड कोटी लोकांचे रोजगार गिळले, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली आहे.

मोदी हे आधुनिक जगाचे हिटलर आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिलाध्यक्ष फौजिया खान यांनी केली. भाजपा सरकार जनतेला काहीच देऊ शकत नाही, फक्त लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही खान यांनी सरकारवर केला.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)