दोन कोटींचे कपडे परस्पर विकून फसवणूक

पिंपरी – पतीच्या निधनानंतर दुकानाच्या मूळ मालकाने 2 कोटी रुपयांची कपडे परस्पर विकून अपहार केला. हा प्रकार 16 जून ते 14 डिसेंबर 2018 या कालावधीत पिंपरी बाजार पेठेत घडला.

दिलीप भुलचंद अथवानी (वय-57), रितेश दिलीप अथवानी (वय-36, रा. पिंपरी) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी इशा पवन चावला (वय-36, रा. साई इमराल्ड सोसायटी, विजयनगर, काळेवाडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. जे. मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीने पिंपरी बाजार पेठेत युनिटी कलेक्‍शन नावाचे कपड्याचे दुकान होते. हे दुकान आरोपींकडून भाड्याने घेतले होते. काही महिन्यांपूर्वी फिर्यादी महिलेचा व तिच्या पतीचा अपघात झाला. यामध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले. तर फिर्यादी याही गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर फिर्यादी यांनी दुकानातील कपड्यासंदर्भात आरोपींकडे विचारणा केली. आरोपींनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. फिर्यादी यांच्या मालकीचा 2 कोटी 3 लाख 67 हजार 900 रुपयांचा माल आरोपींनी परस्पर विकला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)