दोन आठवड्यानंतर पालेभाज्यांची आवक वाढली

पिंपरी – मोशीतील नागेश्‍वर महाराज उपबाजारात दोन आठवड्यांनंतर रविवारी पालेभाज्यांची आवक वाढली आहे. पालेभाज्यांचे भाव स्थिर असून, फळभाज्यांचे भाव वधारले आहेत. फळभाज्यांची एकूण आवक 1012 क्विंटल झाली असून, पालेभाज्यांची आवक 22 हजार 632 गड्डया एवढी झाली आहे. मटार व कारल्याची आवक घटली असून कैरी व फणसाची आवक सुरु झाली आहे.

कांद्याची 178 क्विंटल आवक झाली असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत 15 क्विंटलची वाढ झाली असून भाव स्थिर राहिले. बटाट्याची 70 क्विंटल आवक झाली असून 15 क्विंटलने वाढ झाली असून, भाव देखील 150 रुपयांनी वधारले. भेंडीची आवक आठ क्विंटलने वाढून भावात 1500 रुपयांची सर्वाधिक घट झाली. गवारीची आवक 23 क्विंटलने घटून, भाव 250 रुपयांनी वधारले. तसेच टोमॅटोची आवक 111 क्विंटलने वाढली असून, भाव 50 रुपयांनी वधारले. मटारची आवक 30 क्विंटलने घटली असून, भावात 1000 रुपयांची वाढ झाली. घेवड्याची आवक 10 क्विंटलने वधारली असून, भाव 250 रुपयांनी घटले. दोडक्‍याची आवक तीन क्विंटलने घटून, भाव मात्र 500 रुपयांनी वधारले. लसणाची आवक 58 क्विंटलने वाढून भाव 350 रुपयांनी वधारले. तसेच आल्याची आवक नऊ क्विंटलने वाढून, भाव मात्र स्थिर राहिले.

मिरचीची आवक सहा क्विंटलने वाढली असून, भाव 250 रुपयांनी वधारले. दुधी भोपळ्याची आवक दोन क्विंटलने वाढून भावात 350 रुपयांची वाढ झाली. कारल्याची आवक सात क्विंटलने घटून, भाव मात्र स्थिर राहिले. गाजराची आवक सहा क्विंटलने वाढून भाव 400 रुपयांची वाढ झाली. फ्लॉवरची आवक स्थिर राहुन, 50 रुपयांची किरकोळ वाढ झाली. कोबीची आवक पाच क्विंटलने वाढून भाव 100 रुपयांची वधारले. वांग्यांची आवक चार क्विंटलने घटली असून, भाव मात्र 900 रुपयांनी घटले. लिंबांची आवक पाच क्विंटलने घटून, भावात 700 रुपयांची वाढ झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)