दोन अल्पवयीन मोबाईल चोर पोलिसांच्या जाळ्यात

पिंपरी – चिखली व निगडी परिसरात मोबाईल फोन चोरणारे दोन अल्पवयीन मुले चिखली पोलिसांनी पाठलाग करुन ताब्यात घेतले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली पोलीस गस्त घालत असताना कुदळवाडी परिसरात रहिमान वजन काट्याजवळ दोन संशयीत मुले पोलिसांना दिसली. यावेळी पोलिसांनी जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता ते दोघेही त्यांच्या दुचाकीवरुन पळून जाऊ लागली. यावेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता. त्यांच्या खिशात दोन महागडे फोन पोलिसांना सापडले. यावेळी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांनी निगडी व चिखली परिसरात फोन चोरत असल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून पोलिसांनी 1 लाख 14 हजार रुपये किंमतीचे 25 फोन जप्त केले आहेत. दोन्ही अल्पवयीनांवर निगडी पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल असून ते सराईत असल्याचे समोर आले.

पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, पोलीस अप्पर आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर अवताडे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) मसाजी काळे, पोली उपनिरीक्षक संदीप बागुल, पोलीस हवालदार मंगेश गायकवाड, राम साबळे, सुरेश जाधव, सुनील शिंदे, पोलीस नाईक अमोल साकोरे, सचिन गायकवाड, कबीर पिंजारी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
6 :rage:

1 COMMENT

  1. अमोल पराशाराम पाटील Licence Number MH1220110016718 रहाणार मोरे वस्ती, चिंचवड ही व्यकती Hyundai Xcent, MH12PQ4388, पांढरा रंग ही गाडी घेऊन पुणे येथून फरार झाला आहे तरी कोणालाही ही व्यकती किंवा गाडी कोठेही आढळून आल्यास त्वरीत खालील क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती.
    मो.नं. 8208522364

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)