दोन्ही संघांसमोर कामगिरी उंचावण्याचे आव्हान

पटणा -प्रो कबड्डीमधील पुणे लेगची सांगता पुणेरी पलटणच्या पराभवाने झाली. आज शुक्रवार दि. २६ ऑक्टोबरपासून प्रो कबड्डीचा मुक्काम हा पटणा असेल. यामध्ये पहिला सामना होम टीम पटणा पायरेट्स विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स यांच्यात होणार आहे. हा सामना जिंकून आपल्या घरेलू लेगची सुरुवात विजयाने करण्यास पायरेट्स सज्ज असतील.

 
प्रो कबड्डीचे सलग तीन वेळचा विजेता पायरेट्सचा संघ या सहाव्या मोसमात आपल्या रंगात नाही. त्यांच्या संघातील उणिवा अवघ्या पाच सामन्यात समोर आल्या आहेत. त्यांनी पहिल्या पाच सामन्यातील दोन सामने जिंकले, दोन सामन्यात पराभव तर एक सामना बरोबरीत सोडवला आहे. कर्णधार परदीप नरवाल वगळता अन्य कोणताही खेळाडू चमक दाखवू शकलेला नाही.  या संघासाठी परादीप नरवालचा हरवलेला सूर, डिफेन्समध्ये कमी अनुभवी खेळाडू, दुसऱ्या आणि तिसऱ्या  रेडरचे अपयश हे डोकेदुखी ठरत आहे. 
 
जयपूरचा संघ देखील खूप चांगली कामगिरी करत आहे असे नाही. त्यांच्याकडे कर्णधार अनुप कुमार, दीपक हुड्डा, मोहित चिल्लर, बाजीराव होडगे  यांच्यासारखे मातब्बर खेळाडू असून देखील हा संघ ‘झोन अ’  मध्ये तळाच्या स्थानावर आहे. हा संघ डिफेन्समध्ये मजबूत आहे.  परंतु, रेडींग  विभागात हा संघ कमी पडत आहे. अनुप कुमार आपल्या क्षमतेच्या आसपासची देखील कामगिरी करू शकला नाही. त्याचबरोबर मोक्याच्यावेळी संघाचे मनोबल वाढवण्यात देखील तो कमी पडत आहे. या संघाने तीन सामन्यात दोन पराभव पत्करले असून त्यांनी एक विजय मिळवला आहे. 
 
दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा असणार आहे.  जयपूरला या विजयासह आपली क्षमता सिद्ध करावी लागणार. तर हा सामना जिंकून आपल्या घरेलू लेगची सुरुवात विजयाने करण्यास पायरेट्स उत्सुक असतील. 
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)