दोनशेची छत्री, अन्‌ तीनशे रुपये दुरुस्ती

  • छत्री दुरुस्ती व्यसायाला घरघर : ग्राहकांनी फिरवली पाठ

जळोची – दोनशेची छत्री अन्‌ तीनशे रुपये दुरुस्ती अशी परिस्थीत निर्माण झाल्याने छत्रीादुरुस्ती दुकानांकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. त्यातच गेल्या वर्षी वापरलेली छत्री पुन्हा यावर्षी वापरायची म्हणजे नकोशीच वाटत असते, असा ट्रेंड आता वाढत चालला असल्याने छत्र्या दुरुस्ती व्यवसायाला घरघर लागली आहे.
घरोघरी जपून ठेवलेल्या छत्र्या पुन्हा पावसाळ्यापूर्वी बाहेर काढून त्याची दुरुस्ती केली जात होती. मात्र, आता लोकांच्या खिशात पैसा असल्याने जुन्या छत्र्यांची दुरुस्ती करण्याऐवजी बाजारात कमी किंमतीत मिळणाऱ्या आकर्षक छत्र्यांची खरेदी करणाऱ्यांकडे ग्राहकांचा कल अधिक वाढला आहे. सध्याच्या काळात कामगिरांची कमतरता असल्याने तसेच व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्याचे प्रमाण पाहता कष्ट अधिक; परंतु त्यातून मिळणारे उत्पन्न कमी असल्याचे बारामतीतील दुकानदार सांगतात. शहरातील दुकानांमध्ये सध्याची परिस्थिती पाहता छत्र्याचे प्रमाण कमी झाल्याने छत्रीदुरुस्त करणे परवडत नसल्याचे दुकानंदार सांगतात. नवीन छत्री खरेदीमुळे छत्र्यादुरुस्तीच्या दुकानाकडे ग्राहक पाठ फिरवताना दिसत आहे. दुरुस्तीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी जवळपास 15 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढ करण्यात आली असून, त्यातून नफा हा अत्यंत कमी असल्याने या व्यवसायाला घरघर लागली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)