दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यांना सरकारी सेवांचा लाभ देऊ नये – रामदेव बाबा 

अलिगढ – योगगुरु रामदेव बाबा यांनी पुन्हा एकदा वाढत्या लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. दोनपेक्षा अधिक अपत्य सरकारी सेवासुविधांचा लाभ मिळू नये . तसेच अशा लोकांना निवडणूक लढविण्यास परवानगी देण्यात येऊ नये, असे मत रामदेव बाबांनी मांडले आहे. उत्तप्रदेशस्थित अलिगढ विद्यापीठात एका कार्यक्रमादम्यान त्यांनी हे वक्तव्य केले.

रामदेव बाबा म्हणाले कि, एखाद्या व्यक्तीला दोनपेक्षा अधिक मुले असतील तर त्यांना सरकारी सेवासुविधांचा लाभ मिळू नये आणि सोबत त्यांचा मतदानाचाही अधिकारही काढून घ्यावा.  तसेच अशा लोकांना सरकारी शाळांमध्ये प्रवेश देऊ नये, सरकारी रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर औषधोपचार केले जाऊ नयेत. तसेच अशा व्यक्तींना सरकारी नोकरीचीही संधी नाकारण्यात यावी. या सर्व गोष्टी रोखल्यानंतरच लोकसंख्येवर आपोआप नियंत्रण येईल, असे परखड मत त्यांनी मांडले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/ANI/status/1088231671160139776

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)