पुणे : दोघांवर कोयत्याने सपासप वार

पुणे – भाच्याला मारहाण केल्याचा बदला म्हणून दोघांवर कोयत्याने सपासप वार करुन खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात चौघांविरुध्द खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला गेला आहे.
फिर्यादी वैभव पवार(24,रा.फाटे आळी, कात्रज गाव) व ईश्‍वर निगडे यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले आहेत.

यातील आरोपी संजय जगताप याने त्याचा भाचा सुरज किरण मोरे यास फाटे आळीमध्ये रहाणाऱ्या सौरभ राजु काटे याने मारहाण केली होती. त्याचा राग मनात धरुन संजय जगताप आपल्या तिघा साथिदारांना घेऊन फाटे अळी चौकामध्ये आला होता. यावेळी त्यांच्या जवळ तलवारी व कोयते होते. ही हत्यारे हातात फिरवत व मोठ-मोठ्याने आरडा-ओरडा करत त्यांनी दहशत माजवली. यानंतर घाबरलेल्या लोकांनी घराची दारे व खिडक्‍या बंद केली. दरम्यान आरोपींनी परिसरात असलेल्या फिर्यादी व ईश्‍वर निगडे यांच्यावर कोयत्याने वार केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एस.पी.यादव तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)