भोसरी – दोन तरुणांना चौघांनी निर्जन ठिकाणी पळवून नेत बेदम मारहाण केल्याची घटना भोसरीमध्ये नुकतीच घडली.

शुभम सुभाष दळवी (वय 18, रा. आंबेडकर कॉलनी, पिंपरी) याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरुन पोलिसांनी धिऱ्या (पुर्ण नाव व पत्ता नाही) यांच्यासह अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम दळवी व त्याचा मित्र स्वप्निल प्रकाश निकाळजे या दोघांना अज्ञात चौघांनी पळवून नेले. लाथा-बुक्‍क्‍यांनी व लोखंडी टणक हत्याराने मारहाण करुन जखमी केले. शिविगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देत ते तेथून निघून गेले. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)