“दै. प्रभात’च्या दणक्‍याने कृषी विभागाला जाग

वाई ः स्ट्रॉबेरी पिकाची पाहणी करताना कृषी अधिकारी हरिशचंद्र धुमाळ आपल्या सहकार्‍यांसमवेत.

गोळेगावात जावून केली स्टॉबेरीसह पिकांची पहाणी

रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळावे
कृषी अधिकारी हरिश्‍चंद्र धुमाळ यांचे शेतकऱ्यांना आवाहन

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाई, दि. 17 (प्रतिनिधी) – तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात स्ट्रॉबेरीसह अन्य पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. यासंबंधी दैनिक प्रभात वृत्त प्रसिद्ध केले होते. “दै. प्रभात’च्या वृत्तानंतर खडबडून जागे झालेल्या कृषी विभागाने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पश्‍चिम भागातील पिकांची पाहणी केली आहे.
वाई तालुक्‍याच्या कृषी अधिकारी हरिश्‍चंद्र धुमाळ यांनी आपल्या टीम समवेत त्वरित जावून गोळेगाव, गोळेवाडी या गावांतील स्टॉबेरीसह सर्व फळ भाज्यांची पहाणी शेतावर जावून संबंधित शेतकऱ्यांसमवेत भाजी पाल्यांवर कशा पद्धतीने औषधांची फवारणी करावयाची या बाबत मार्गदर्शन केले.
बदलत्या हवामानामुळे भाज्यांवर करप्या, पांढरी भुरी, तांबेरा, फळे कुरतडणारी आळी या रोगांचा प्रादुर्भाव प्रखरतेने जाणवू लागला असून त्यावर उपाय करण्यासाठी वाई तालुका कृषी विभागाने कंबर कसली आहे. तालुक्‍यातील स्टॉबेरीसह फळे, भाज्या उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रबोधन करण्यासंदर्भात कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचा तालुक्‍यातील सर्वच प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी हरिश्‍चंद्र धुमाळ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
शेतकऱ्यांनी सेंद्रिय खते वापरून फळभाज्यांचे उत्पन्न घेतल्यास या रोगांचा प्रादुर्भाव कमी होवून भाज्यांचे उत्पन्न वाढून मालाला चांगली मागणी मिळू शकते. सध्या पडलेल्या रोगा संदर्भात कृषी अधिकारी धुमाळ म्हणाले, ढगाळ व आर्द्रता जास्त असलेल्या हवामानात स्टॉबेरी पिकाला पाणी कमी द्यावे, व पिकावर कॅल्शियम नायट्रेट फवारावे, वेलवर्णीय भाजीपाला-दोडका, कारली, मिरची, मका, ज्वारी या पिकांवर हेक्‍झाकोनोझोल फवारावे, तांबेरा रोगासाठी प्राफिकॅनॉझोल फवारावे, फुलकळी व अधिक उत्पादनासाठी बायोफिट किंवा नायट्रोबेन्झीन 20 टक्के, जीब्रॅलीन, ऑक्‍झीन, सायटोकायननिसीस, फ्लॅनोफिक्‍स, यांची फवारणी 25 ते 30 मिली 15 लिटर पाण्यातून सात दिवसांच्या अंतराने फवारावे. तर भाजी पाल्यांची चांगली वाढ होवून कोणत्याही रोगांचा प्रादुर्भाव जाणवणार नाही. असेही ते म्हणाले. तसेच कृषी विभागच्या संपूर्ण टीमने रोगाची लागण झालेल्या शेतीची पाहणी करीत पंचनामा केला व तसा अहवाल शासनाकडे पाठविणार असल्याचे आश्वासन यावेळी संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आले. यावेळी गोळेगाव परिसरातील प्रगत शेतकरी जितेंद्र गोळे, सुनील गोळे, विष्णू कदम, बबन कदम, साहेबराव जाधव, विष्णू शिर्के, आनंदराव गोळे यांच्या सह कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक नितीन धुमाळ, कृषी सहाय्यक हरिश लांडगे, गणेश बनसोडे, राजेंद्र नलावडे या अधिकाऱ्यांसह, ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)