दै.प्रभातचे दिवाळी अंक प्रकाशन संपन्न

पुणे: “”प्रत्येक व्यक्तीमध्ये यश मिळविण्याची क्षमता असते. त्यासाठी लागणारे कौशल्यदेखील त्या व्यक्तीमध्ये असते. मात्र गरज असते, ती स्वत:मधील कौशल्य ओळखून त्याला योग्य दिशा देण्याची. आयुष्यात मोठे होण्यासाठी तुमचे उद्दिष्ट मोठे ठेवा आणि त्यादृष्टीने वाटचाल करा. त्यातून निश्‍चितच तुम्हाला यश मिळेल,’ असा कानमंत्र पुणे पीपल्स को-ऑप. बॅंकेचे अध्यक्ष व सहकार क्षेत्रातील तज्ञ ऍड.सुभाष मोहिते यांनी दिला. त्याचबरोबर गेली सुमारे 23 वर्षे ज्या वृत्तपत्राविषयी जिव्हाळा निर्माण झाला आहे, त्या प्रभातच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्याची संधी मला मिळाली याचा प्रचंड आनंद होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दैनिक प्रभातच्या “दीपोत्सव-2018′ या दिवाळी अंकाचे प्रकाशन प्रभातच्या कार्यालयात झाले. त्यावेळी ते बोलत होते.बाजारामध्ये अनेक दिवाळी अंक असताना देखिल प्रभातच्या उत्कृष्ट शैली आणि दर्जेदार लेखनामुळे प्रभातच्या दिवाळी अंकाने वाचकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. त्याचबरोबर अंकाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वर्षीच्या “प्रभात दीपोत्सव’ या अंकातील लेखन आणि दिवाळी अंकाची वैशिष्टये दै. प्रभातचे महाव्यवस्थापक बी. एल. स्वामी यांनी सांगितली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“प्रभात’चे कार्यकारी संपादक अविनाश भट यांनी प्रभातचे योगदान आणि दिपावली अंकासाठी प्रभात सातत्याने राखत असलेल्या दर्जाविषयी माहिती दिली. यावेळी पीपल्स को-ऑप. बॅंकेचे एजीएम व सहकार तज्ञ उमेश समुद्र, “सारद मजकूर’चे अभिजित सोनावणे, अंकाची मांडणी करणारे प्रभाकर भोसले, लेखक रवी देसले आदी मान्यवर उपस्थित होते. उपसंपादक श्रीनिवास वारुंजीकर यांनी सुत्रसंचलन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)