दै.प्रभातचे गुरूनाथ जाधव यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

नगरपालीका व पत्रकार संघाकडून वितरण; शहरातील 11 पत्रकारांचा समावेश
सातारा,दि.6(प्रतिनिधी)
सातारा नगरपालिका व सातारा पत्रकार संघ यांच्यावतीने दै. प्रभातचे प्रतिनिधी गुरूनाथ जाधव यांच्यासह साताऱ्यातील 11 पत्रकार, छायाचित्रकरांना श्री.छ.प्रतापसिंह महाराज (थोरले) उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाले आहेत.

नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी याबाबतची घोषणा केली.
सातारा नगरपालिकेने दरवर्षी सातारा शहरात काम करणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानुसार सातारा शहरातील 11 पत्रकारांना या वर्षी सन्मानित केले जाणार असून त्यामध्ये गुरुनाथ जाधव, पांडूरंग पवार, सुजित आंबेकर, आदेश खताळ, दीपक दिक्षित, मोहन मस्कर -पाटील, तुषार तपासे, विशाल कदम, संग्राम निकाळजे, प्रमोद इंगळे, जावेद खान यांचा समावेश आहे.

पुरस्काराचे स्वरूप रोख 5 हजार रुपये रक्कम, सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे असणार आहे. दरम्यान, दरवर्षी ही पुरस्कार योजना सुरूच राहणार असल्याचे सातारा पालिकेच्यावतीने जाहीर केले आहे. लवकरच एका कार्यक्रमात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार वितरण केले जाणार असल्याचेही नगरपालिकेने कळवले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)