देहू पोटनिवडणुकीत पूनम काळोखे विजयी

देहुरोड – देहूगाव ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक सहामधील एका रिक्‍त जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत पूनम विशाल काळोखे यांचा 76 मतांनी विजय मिळवला. देहू ग्रामपंचायतच्या रविवारी झालेल्या पोटनिवडणुकीचा सोमवारी निकाल जाहीर करण्यात आले.

मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरूवात झाली. ही प्रक्रीया सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास संपली. पूनम विशाल काळोखे यांना 457, पौर्णिमा अमित काळोखे यांना 381, तर माजी सदस्या ज्येष्ठ महिला लिलाबाई आनंदा काळोखे यांना 226 मते मिळाली, तर वरील पैकी एकही नाही (नोटा) यासाठी 15 मतदारांनी आपला नोटाचा अधिकार बजावल्याचे मतमोजणीत निष्पन्न झाले आहे. झालेल्या या पोटनिवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी व मतमोजणी अधिकारी म्हणून चिंचवडचे मंडल अधिकारी शेखर शिंदे यांनी कामकाज पाहिले. निवडणूक निर्णय अधिकारी शेखर शिंदे यांनी पूनम काळोखे यांना विजयी झाल्याचे घोषित करीत प्रमाणपत्र दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)