देहू परिसरात मुलींनी मारली बाजी

Graduation mortar on top of books

देहुरोड  – देहूगाव-देहूरोड येथील विद्यालयातील बारावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यामध्ये परिसरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये मुलींनीच बाजी मारली आहे.

देहूगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या संत तुकाराम विद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्याचे वाणिज्य शाखेत 98.55 टक्‍के, तर कला शाखेत 95.74 टक्‍के निकाल लागले आहे. या निकालात मुलींनी बाजी पटकावल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य एस. एम. दळवी यांनी दिली.

वाणिज्य शाखा (कंसात टक्‍के) अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय : पूनम बबन पवार (82.46), काजल चंद्रकांत भसे (78.46), प्रणाली चंद्रकांत मोरे (75.38). देहुरोड येथील श्री शिवाजी विद्यालयाचा वाणिज्य शाखेचा 84.68 टक्‍के निकाल लागला आहे. गायत्री गोरख कळसाईत हिने 74.79 टक्के गुण घेत विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला. अक्षदा देवदत्त शिंदे हिने 74.46 व जॅकलीन जोनस फ्रांसीस हिने 74.31 गुण घेत अनुकमे द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्‍वर शितोळे यांनी माहिती दिली.

लायन्स क्‍लबच्या विद्यालयाच्या बारावीत 71 विद्यार्थी असून, सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने 100 टक्‍के शाळेचा निकाल जाहीर झाले आहे. शेरॉन अब्राहम भंडारे हिस 80.15 टक्‍के, आश्‍मा अब्दुलरहेमान जिंगारी 77.69, तर शुष्मीत कौर बेदी 77.38 टक्के गुण मिळवित विद्यालयात अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावल्याची माहिती प्राचार्य कैलास कालापहाड यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)