देहू आरोग्य शिबिरात 61 रुग्णांची मोफत तपासणी

देहुरोड – पुणे येथील हिलिंग हॅंन्डस क्‍लिनिक आणि हिलिंग हॅंन्डस फाऊंडेशन व प्राथमिक आरोग्य केंद्र देहू यांच्या वतीने आयोजित पोटाचे आजार आणि पायाचे रोग तपासणी शिबीरात 61 रुग्णांची तपासणी करुन मोफत औषोधोपचार करण्यात आले.

हिलिंग हॅंन्डस क्‍लिनिक व फाऊंडेशनचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्‍विन पोरवाल यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. मयूर नारायणकार यांनी पोटाचे आजार असलेल्या व पायाचे आजार असलेल्या रुग्णांची तपासणी करुन आजाराचे अनुषंगाने मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.

या शिबिरात अपचण, मुळव्याध, बद्धकोष्ठता, भगंदर, हार्निया आदी पोटाशी निगडित व “व्हेरिकोस व्हेन्स’मध्ये पायाच्या शिरा फुगणे, वेड्यावाकड्या होणे, पायाची त्वचा काळी निळी होणे, पायाच्या त्वचेला खाज येणे, तळपायाची जळजळ होणे, नसा फुगणे त्वचेत रक्‍त साकाळणे यासारखे आजार असलेल्या 61 रुग्णांवर उपचार करुन मोफत औषधे वाटप करण्यात आली.

शिबिराचे व्यवस्थापन अनिता सैद यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, डॉ. रणजित कांबळे तसेच सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)