देहूरोड राष्ट्रवादीच्या वतीने आमदार कदम यांना जोडे मारो आंदोलन

पेट्रोल-डिझेल, गॅसच्या वाढत्या दरामुळे केंद्र : राज्य सरकरचा केला निषेध

देहुरोड – मुलींना पळवून नेण्यासाठी मदत करण्याबाबतचे वादग्रस्त विधान भाजपचे प्रवक्‍ते आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात घाटकोपर येथे केल्याच्या निषेधार्थ त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तसेच गेली चार वर्षे भाजपप्रणित केंद्र व राज्य सरकार पेट्रोल-डिझेल, गॅसच्या दरात वारंवार वाढ करीत असल्याने सामान्य जनता त्रस्त झाली असल्याने सरकारच्या निषेधार्थ देहुरोड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

देहुरोड येथील मेन बाजारपेठेतील ऐतिहासीक नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात शनिवारी देहूरोड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस, महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस व विविध सेलच्या वतीने झालेल्या आंदोलनात आमदार राम कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोडे मारून आंदोलन करीत निषेध व्यक्‍त केला. यावेळी कार्यकर्त्यांनी कदम व भाजप सरकार विरोधात घोषणा दिल्या.

भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून गेली चार वर्षात वारंवार पेट्रोल, डिझेल, व गॅसच्या किमती वाढविल्या जात असल्याने महागाई वाढत असल्याने सामन्यांचे जीवन असह्य झाले असून, जगणे मिश्‍किल आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष यदुनाथ डाखोरे, शहराध्यक्ष ऍड. कृष्णा दाभोळे, महिला शहराध्यक्षा शीतल हगवणे, तळेगाव शहर महिलाध्यक्षा सुनीता काळोखे, जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब जाधव, रंजना सपकाळे, मनसुबी काझी यांनी आमदार कदम व केंद्र सरकारचा निषेध व्यक्‍त करणारी मते व्यक्‍त केला. आमदार कदम यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबतचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक ए. एम. लांडगे यांना दिले.

या वेळी युवकाध्यक्ष संदीप जाधव, माजी शहराध्यक्ष मिकी कोचर, रेणू रेड्डी, नंदकुमार काळोखे, वैशाली टिळेकर, स्वाती जाधव, रुपाली दाभोळे, सविता जाधव, रसिका दाभोळे, राजश्री राऊत, सुनीता जाधव, ज्योती गायकवाड, मनीषा मेटकर, वैशाली काटे, गणेश कोळी, किशोर जगताप, धनंजय मोरे, सतिश भेगडे, धनराज शिंदे, कैलास गोरवे, बाळासाहेब पिंजण, सुनील जाधव, तरलोचन रत्तू, मयूर जाधव, अशोक नाईक, मुंडेराव पांचाळ, दत्ता गरुड, रफिक शेख, विजय पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)