देहूरोड येथे महिलेचा साडेचार लाखांचे दागिने बसमधून लंपास

देहूरोड, (वार्ताहर) – लोणावळा-पुणे बसमधून प्रवास करणाऱ्या गांधीनगर देहूरोड येथील एका महिलेच्या बॅगेतील साडेपंधरा तोळे सोन्याचे दागिने आणि 70 ग्रॅम चांदीच्या पटट्या असे सुमारे साडेचार लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरटयांनी लंपास केले आहे. रविवारी (दि. 27) दुपारी चार ते पाच प्रवासा दरम्यान घडले आहे.

हेमलता रमेश रेड्डी (वय 30, रा. मरीमाता मार्ग, गांधीनगर, देहूरोड) असे चोरी गेलेल्या दागिने प्रकरणी फिर्याद नोंदविलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, हेमलता ही रविवारी देहूरोडला येताना लोणावळा येथून चार वाजता बसमध्ये बसल्यावर पाचच्या सुमारास उतरल्या. घरी गेल्यानंतर बॅगची तपासणी करताना बॅगेतील सोन्याचे नेकलेस, राणीहार, गंठण, अंगठी, कानातील टॉप, झुमके, तसेच चांदीच्या पटट्या ठेवलेले लाल रंगाचा बॉक्‍स नसल्याने प्रवासादरम्यान चोरीला गेल्याचे उघडकीस आले. प्रवासा दरम्यान तेलगु भाषेत संभाषण करणाऱ्या दोन महिलांवर संशय असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण मोरे अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)