देहूरोड जकात नाक्‍याजवळ दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू

देहुरोड – देहुरोड येथील लष्करी हद्दीतील फिल्ड ऍम्युनिशियन डेपोजवळ धोकादायक वळणावर बसविण्यात येत असलेल्या संरक्षक लोखंडी कठड्याच्या खांबाला धडकून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. पुणे-मुंबई महामार्गावर मंगळवारी (दि. 4) दुपारी पावणेचारच्या सुमारास ही घटना घडली. प्रशांत मधूसुदन कांबळे (वय 44, रा. मुरबाड रोड, कल्याण, मुंबई) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचा नाव आहे.

देहुरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई मार्गावर मुंबईहुन पुण्याकडे भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीस्वाराला (एम.एच. 5 ए.डी. 5208) महामार्गावरील वळण रस्त्याचा अंदाज न आल्याने महामार्गाच्या संरक्षक खांबाला धडक दिली. धडकेनंतर दुचाकी खांब तोडून लगतच्या खड्ड्यात खाली पडली. दुचाकीस्वार कांबळे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांकडून सांगण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)