देहूरोडला ख्रिस्ती बांधवांचा पाम संडे साजरा

देहूरोड, (वार्ताहर) – देहुरोड येथील महनेदान फेलोशिप चर्चमध्ये पाम संडे म्हणजे झावळयांचा रविवार विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

रेव्हरंट डॉ. सुनील साठे यांनी पवित्र बायबल यामधून संत लुकाचे शुभवर्तमान 19.38 होसान्ना होसान्ना प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादीत असो. या अनमोल अशा वचनावर संदेश दिला. प्रभू ख्रिस्ताने अखिल मानवजातीला तारण, क्षमा, शांती देण्यासाठी वधस्तंभावर आपले बलिदान दिले. यासाठी यरुशलेम शहरात येत असताना लोकांनी प्रभू येशूला राजा मानून तसेच हातात खजुरीच्या झावळ्या घेऊन व आपले वस्त्र प्रभू येशूच्या मार्गावर पसरवित प्रभू येशूचे होसान्ना होसन्ना (“आमचे तारण कर’) अशी प्रार्थना करीत, स्तुती जयघोष करीत होते. लोकांनी याद्वारे आपला विश्‍वास, लिनता, नम्रता प्रकट केली.

आज आम्ही सर्वानी लिन, नम्र होऊन विश्‍वासाने प्रभू येशूने दिलेल्या आज्ञांचे पालन केले. पाहिजे व सुवार्ता, शांती बंधूभावाचा संदेश सर्वांना दिला पाहिजे हाच पाम संडेचा मुख्य संदेश आहे, असे रेव्हरंट डॉ. साठे यांनी आपल्या प्रवचनातून केले. पास्टर थॉमस वर्गीस यांनीही मार्गदर्शन केले. या वेळी बहुसंख्येने चर्चमध्ये ख्रिस्ती समाज बांधव, भाविक उपस्थित होते. पास्टर विकास जावळे, जोश सायमन, ब्रदर जिग्नेश, रेणुका जावळे, रंजना साठे यांनी या विशेष प्रार्थना सभेचे आयोजन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)