देहूत रयत शिक्षण संस्थेचा शताब्दी वर्ष साजरा

देहुरोड – देहूगाव येथे रयत शिक्षण संकुलाच्या वतीने रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त शुक्रवारी (दि. 5) विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, जनक कर्मवीर भाऊराव पाटील यांची प्रतिमा आणि रथ फुलांनी सजवण्यात आला होता.

या रथाची सजावट एस. बी. शिंदे, के. एम. अमोदकर यासह त्यांच्या शिक्षक वर्ग यांनी केली. रथाची व प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांनी गावातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत विविध वेशभूषा पथके, लेझीम पथक सहभागी झाले होते. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, कर्मवीर अण्णा अमर रहे आदी घोषणांनी परिसर दुमदुमत होते. या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक आय. एस. जगताप, उपमुख्याध्यापिका एस. एम. वडळकर, पर्यवेक्षक पी. पी. मोरे, विद्यार्थी, शिक्षक वर्ग उपस्थित होते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)