देहूत पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या

पिंपरी – मानसिक तणावातून मानसिक आजाराने ग्रासलेल्या चिंचवड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 26) सकाळी उघडकीस आली.

जयंत कृष्णराव कसबे (वय-50, रा. देहूरोड) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कसबे मागील दहा वर्षांपासून मानसिक तणावात असून ते मानसिक आजाराशी झुंजत होते. काही दिवसांपूर्वी त्यांना मानसिक आजाराचा जास्तच त्रास होऊ लागल्याने त्यांनी कामावरून सुट्टी घेतली होती. शनिवारी (दि. 25) रात्री घरच्यांसोबत जेवण करून ते झोपण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले. सकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांना उठवण्यासाठी नातेवाईक त्यांच्या खोलीत गेले असता छताच्या पंख्याला त्यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)