देहूत तरुणाची आत्महत्या

देहुरोड – देहुगाव येथे एका तरुणाने घरात कोणीही नसताना नायलॉन दोरीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवार दि. 10 ला सकाळी अकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सुरेश ज्ञानेश्‍वर खरड (वय 26, रा. देहुगाव, गाथा मंदिर रोड, मूळ रा. देव-टाकळी, ता. शेवगाव, अहमदनगर) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.

सुरेश दिल्ली येथे नोकरी करीत होता. एक वर्षापूर्वी त्यांनी नोकरी सोडली होती. मात्र नवीन नोकरी मिळाली नसल्याने नोकरीच्या नैराशेतून गळफास घेतल्याचे प्राथमिक अंदाज असल्याचा पोलीस कर्मचारी रमेश चितारे यांनी सांगीतले. या प्रकरणी पोलीस कर्मचारी पी. डी. मसले तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)