देहूत असंघटीत कामगार संघटनेची स्थापना

देहूरोड – भक्ती शक्ती असंघटीत व संघटित कामगार संघटनेची देहूगाव येथे स्थापना करण्यात आली. यावेळी सरपंच उषा चव्हाण, विविध कार्यकारी सोसायटीचे अभिमन्यू काळोखे, माजी सरपंच रत्नमाला करंडे, येलवाडीचे माजी सरपंच नितीन गाडे, पंचायत समितीचे माजी सदस्य सुहास गोलंडे, बाळासाहेब काळोखे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माऊली काळोखे, शिवसेनेचे विभाग प्रमुख सुनिल हगवणे, देहू कॉंग्रेसचे अध्यक्ष रशिद धोंडफोडे, महिलाध्यक्षा वनीता देशकर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ देशकर, सचिव देविदास जाधव, ग्रामपंचायत सदस्य संतोष हगवणे, माजी सरपंच मधुकर कंद आदी उपस्थित होते.

तर असंघटित कामगारांनी एकत्रित होऊन आपल्या हक्कासाठी अविरत कामकाज केले पाहिजे.जर संघटना मजबूत असेल शासकीय योजनांचा लाभ आपल्याला लवकरात लवकर घेता येईल, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस वसंत भसे यांनी केले. सोमनाथ देशकर यांनी असंघटीत कामगारानां नाव नोंदविण्याचे आवाहन करीत शासकीय योजनाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघटनेचे सचिव जाधव यांनी केले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)