देहूतून 30 किलो प्लॅस्टिकरहित कापडी पिशव्या जप्त

  • “पीसीबी’कडून कारवाई : सुमारे 40 दुकानांची तपासणी
  •  गावात प्लॅस्टिक जनजागृती राबविण्याच्या सूचना
  •  सुमारे 85 हजारांचा दंड वसूल

देहुरोड – पुणे येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (पीसीबी) फिरते पथकाने देहूगाव येथे शनिवारी (दि. 29) 40 दुकाने व हातगाड्याची तपासणी करीत सुमारे 30 किलो वजनाचे प्लॅस्टिकरहित कापडी पिशव्या जप्त केल्या.
देहूगाव परिसरामध्ये शनिवारी अचानक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे फिरते पथक दाखल झाले. या पथकामध्ये विभागीय अधिकारी रेखा तोगडे आणि राजेश जाधव यांनी ग्रामपंचायत कार्यालयाचे तीन-चार कर्मचारी सोबत घेत परिसरातील हातगाड्या, फेरीवाल्यांसह दुकानांची तपासणी केली.

या वेळी ग्राहकांना देण्यात येणाऱ्या आणि विक्री करण्यात येत असलेल्या कापडी पिशव्यांमध्ये 80 टक्‍के प्लॅस्टिक असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईमध्ये सुमारे 30 किलो वजनाचे पिशव्या जप्त करण्यात आल्या. जप्त करताना स्थानिक प्रशासनाकडून या पिशव्याबाबत कोणतीही सूचना, नोटीसा किंवा माहिती दिली. नोटिसा न देता अचानक धाड टाकल्याने काही व्यापाऱ्यांनी दंड दिला नाही. यासंदर्भात सुमारे 85 हजार रुपयांचा दंड वसूलण्याचा देहू ग्रामपंचायतीला मंडळाच्या अधिकारी यांनी आदेश दिले. प्लॅस्टिक संदर्भात जनजागृती राबविण्याचे सूचना केल्या आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)