देहूतील इंद्रायणी नदी केटी बंधारा दुरुस्ती करा

संत तुकाराम संस्थान : देहू-आळंदी मार्गाचे डांबरीकरण व्हावे

देहुरोड – तीर्थक्षेत्र देहू येथील इंद्रायणी नदी पात्रात असलेला नादुरूस्त कोल्हापूर बंधारा, नदी पात्रातील संपूर्ण राडारोडा काढणे आणि देहू ते तळवडे दरम्यानचा देहू-आळंदी संपूर्ण रस्त्याचे रुंदीकरणापूर्वी नवीन डांबरीकरणाचे काम बीज सोहळ्यापूर्वी करण्याची मागणी श्री संत तुकाराम संस्थानने केली आहे. अन्यथा बीज सोहळ्यापासून वारकरी सांप्रादायाचे जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

मावळ, खेड आणि हवेली तालुक्‍यातील परिसराला तसेच शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करणाऱ्या पवित्र इंद्रायणी नदीत देहू येथे सुमारे 60 वर्षांपूर्वी बांधलेल्या कोल्हापूर पद्धतीचा वसंत बंधारा नादुरूस्त झालेला आहे. बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पाण्याच्या गळतीने नदी पात्रात पाणी संपुष्टात येत आहे. तसेच तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत नदी पात्रालगत बांधण्यात आलेले घाट आणि नदीवरील नवीन पुलाने पात्रात राडारोडा मोठ्या प्रमाणात असल्याने तसेच पूररेषा सीमेत अतिक्रमणे होवून होणारी बांधकामांनी पात्र अरूंद झाले आहे. त्यामुळे संपृष्टात येणाऱ्या पाण्याने शेतकऱ्यांसह नदी पात्रातील माशांच्या जिवीताला धोका निर्माण झाले आहे.

कारखाने आणि वर्कशॉपचे केमीकल मिश्रीत दूषित पाणी नदी पात्रात मिसळत असल्याने शेतमालाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना धोकादायक ठरत आहे. मुख्य मंत्री, जलसपंदा मंत्री, विभागीय आयुक्‍त, जिल्हाधिकारी यांनी पवित्र इंद्रायणीच्या काठावरील देहू, आळंदी आणि पंढरपूर या तीन तिर्थक्षेत्रात येणाऱ्या लाखो भाविकांकडे लक्ष देत देहू येथील इंद्रायणी नदी पात्रात असलेला नादुरूस्त कोल्हापूर बंधारा दुरूस्त करण्यात यावा, इंद्रायणीच्या पात्रातील संपूर्ण राडारोडा काढण्यात यावा.

याशिवाय अनेक वर्षांपासून खड्‌डेमय बनलेला देहू ते तळवडे दरम्यानचा देहू-आळंदी रस्त्यावरून देहू-आळंदी मार्गाने प्रतिदिन हजारो भाविक ये-जा करीत असतात. रुंदीकरणाचा वादग्रस्त, पिंपरी-चिंचवड महानगर पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लालफितीत अडकलेल्या या संपूर्ण रस्त्याचे (देहूला रिंगरोड असल्याने) रूंदीकरणापूर्वी तरी आहे, तेवढ्याच रस्त्याचे किमान नवीन डांबरीकरणाचे काम बीज सोहळ्यापूर्वी करण्याची मागणी केली आहे. मार्च महिन्यात होणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यापूर्वी ही कामे पूर्ण न झाल्यास श्री संत तुकाराम संस्थानच्या वतीने वारकरी संप्रादायाच्या माध्यमातून जनआंदोलन छेडण्यात येईल, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. पंढरीनाथ महाराज मोरे, ह. भ. प. सुनील दामोदर मोरे, ह.भ.प. जालिंदर महाराज मोरे, ह.भ.प. सुनील दामोदर मोरे, ह.भ.प. विठ्ठल महाराज मोरे, ह.भ.प. अभिजीत महाराज मोरे, ह.भ.प. अशोक महाराज मोरे यांच्या उपस्थित दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)