देहूगावातील दुकानात चोरी

पिंपरी – दुकानाचा पत्रा उचकटून दुकानातून 1 लाख 57 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरटयांनी चोरून नेला. ही घटना देहूगावातील नवीन बायपास चौकात बुधवारी (दि. 20) पहाटे घडली. संदीप भगवान शेळके (वय 46, रा. एकता चौक, तळवडे) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप यांचे देहूगाव मधील नवीन बायपास चौकात इंदू इंजिनिअर्स नावाचे दुकान आहे. अज्ञात चोरट्यांनी बुधवारी पहाटे दोन ते साडेचार या कालावधीत फिर्यादी यांच्या दुकानाचा तसेच आसपासच्या दुकानाचे पत्रे उचकटून 1 लाख 57 हजार 600 रुपयांचा ऐवज चारुन नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)