देहुरोड विकासनगर परिसरात रस्त्यावरील खडी हटवण्याची मागणी

देहुरोड, (वार्ताहर) – देहुरोड-विकासनगर येथे महामार्गालगत टाकण्यात आलेली दगड-खडी हटवण्याची मागणी शिवसेनेचे विजय थोरी यांनी देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत सानप यांच्याकडे केली आहे.

निगडी-देहुरोड दरम्यान महामार्गाचे सव्वा सहा कि. मी. अंतरात चौपदरीकरणाचे आणि उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. येथील देहुरोड-विकासनगर मार्गावर महामार्गालगत चौकात रस्त्याचा उतार कमी करण्यासाठी टाकलेल्या दगड-खडीवरून दुचाकी वाहने घसरून अनेक अपघात घडले आहेत. या रस्त्यांचे त्वरित डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे थोरी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)