देहुरोड येथे डॉ. आंबेडकर जयंती साजरी

देहुरोड  – बुद्ध विहार ट्रस्टने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 व्या जयंती देहुरोड येथील धम्मभूमीवरील बुद्ध विहारात साजरी केली. देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्ड रुग्णालय प्रांगणात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास ट्रस्टचे कार्याध्यक्ष ऍड. गुलाबराव चोपडे यांनी पुष्पहार अर्पण केला. धम्मभूमीवरील अस्थीस्तुपास ट्रस्टचे विश्‍वस्त सुनील कडलक यांनी पुष्पहार अर्पण केला. ट्रस्टचे सहसचिव सुमेध भोसले यांनी त्रिशरण पंचशील, धम्म वंदना केली. डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करून नगरसेवक गोपाळराव तंतरपाळे, ऍड. चोपडे, संजय ओव्हाळ, रोहन गायकवाड यांनी बाबासाहेब यांच्या जीवन चरित्रावर मनोगत व्यक्‍त केले.

नगरसेवक हाजिमलंग मारीमुत्तू, सूर्यकांत सुर्वे, चंद्रकांत गायकवाड, धर्मपाल तंतरपाळे, दिलीप कडलक, सिद्धार्थ चव्हाण, राहुल गायकवाड, सुनील गायकवाड, के. एच. सूर्यवंशी, संजय आगळे, संजय शेडे, सुदेश भोसले, रोहन भोसले, सारीका आढाव, राजश्री जाधव आदी यावेळी उपस्थित होते. ट्रस्टचे सचिव ऍड. अशोक रूपवते यांनी सूत्रसंचालन केले. सुनिल कडलक यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)