देहुरोड परिसरात रामनवमी उत्साहात साजरी

देहुरोड (वार्ताहर) – देहू-देहूरोड परीसरात रामनवमी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. तीर्थक्षेत्र देहू येथील मुख्य मंदिरातील राम मंदिरात भाविकांनी दर्शनार्थ सकाळपासून रांगा लावल्या होत्या.दर्शनामध्ये महिला वर्गाची संख्या मोठी होती. श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येवून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

भजनी मंडळाचे भजन सुरू होते. संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, विश्‍वस्त सुनील दामोदर मोरे, विठ्ठलबुवा मोरे, अभिजित मोरे, अशोक मोरे, जालिंदर मोरे, सुनील दिगंबर मोरे उपस्थित होते. देहूरोड बाजार पेठेत रामनवमी महोत्सव समितीच्या वतीने दुपारी अन्नदान करण्यात आले. सायंकाळी प्रभु श्रीरामाची 15 फुटी उंच मुर्तीची आकर्षक विद्युत रोषणाईने सजवलेल्या रथातून ढोल-ताशांच्या गजरात जय श्रीरामच्या जय घोषात मिरवणूक काढण्यात आली. उद्योजक राजेश मांढरे, बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, सागर लांगे, शुभम डिकाव, लक्ष्मण डिकाव आदी रॅलीमध्ये सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)