देहुरोड परिसरात महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी

देहुरोड- देहुरोड, विकासनगर परिसरात वाल्मिकी समाजाच्या वतीने आद्य गुरु महर्षी वाल्मिकी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयात महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला आयटी सेलचे अध्यक्ष जोगिंदर डुमडे, सुनील घोडेकर यांनी पुष्पहार अर्पण केले. बोर्डाचे नरेंद्र महाजनी, सी. एल. कुऱ्हाडे, किरण गोंटे, राजेंद्र कासर, नंदकुमार करंजावले, प्रवीण गायकवाड, टोनी ऍन्थोनी, सुनिल गुरव, दयानंद भादड, श्‍याम चव्हाण, रोहिदास भंम्बुक, तीर्थपाल खाकी, राकेश झंझोटड, कुणाल ओव्हाळ, महेश हेगडे आदी कर्मचारी उपस्थित होते.

देहुरोड येथील गुरुद्वारा मागील वाल्मिकी मंदिरात महाराष्ट्र राज्य वाल्मिकी समाजाचे देहूरोड शहराध्यक्ष भरत भंम्बुक, पोलीस उपनिरीक्षक अबुकर लांडगे, संदीप भंम्बुक यांनी महर्षी वाल्मिक यांच्या प्रतिमेचे पूजन केले. वाल्मिकी समाजाचे पुणे जिल्हाध्यक्ष राजू कांगडा, भारद्वाज चंडालिया, राकेश सोदे, किशोर बिडलान आदींनी रॅलीचे आयोजन केले. मिरवणूक मुख्य बाजारपेठ मार्गे महर्षी वाल्मिकी चौकात आल्यानंतर वाल्मिकी बॉईजच्या वतीने सत्कार स्वीकारत श्रीकृष्णनगर येथील श्री वाल्मिक मंदिरात मिरवणुकीचे समारोप करण्यात आले. यावेळी नगरसेवक गोपाळराव तंतरपाळे, महिला मंडळ अध्यक्षा विद्या ढिल्लोड, फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचचे धर्मपाल तंतरपाळे, किशन बिडलान, दीपक सायसर आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देहूरोड दत्तनगर ग्रुपच्या वतीने दत्तनगर येथून श्री महर्षी वाल्मिकी यांची प्रतिमा पालखीमध्ये ठेवून पालखी श्रीकृष्णनगर येथील श्री वाल्मिकी मंदिरात आल्यानंतर पूजन, आरती करण्यात आली. त्यावेळी विजय कल्याणी, राकेश सोलंकी, आनंद कल्याणी, सागर भिगानिया, बलवीर टाक, सुरेश भिंगानिया, बलराज भिंगानिया, पृथ्वी कल्याणी व महिला वर्ग उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)