देहुरोड परिसरात भारत बचाव रथयात्रेचे स्वागत

देहुरोड – विश्व हिंदु परिषद व बजरंग दल यांच्या वतीने कश्‍मीर ते कन्याकुमारी अशी काढण्यात आलेल्या वीस हजार किलोमीटरच्या महारथयात्रेचे देहुरोड येथे आगमन झाले. देहुरोड येथे रथयात्रेचे स्वागत करण्यात आले.

लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करण्यासाठी, तसेच परिवार, धर्म आणि राष्ट्रहितासाठी ही भारत बचाव महा रथयात्रा काढण्यात आली. परिवार,धर्म आणि राष्ट्रहितासाठी कश्‍मीर ते कन्याकुमारी अशा 20 हजार कि.मी यात्रेचे विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने मावळ तालुक्‍यामध्ये स्वागत करण्यात आले.

देहुरोड येथील स्वामी विवेकानंद चौकात यात्रेचे स्वागत करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पाहार अर्पण करण्यात आले व श्री गुरूसिंग सभा गुरुद्वारात दर्शनानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्‍त केले. बजरंग दल देहुरोड उपखंडाचे सुनिल अगरवाल, नगरसेवक रघुवीर शेलार, भाजपाचे माजी शहराध्यक्ष गुरूमितसिंग रत्तू, संदेश भेगडे, अनिल खंडेलवाल, नरेश गुप्ता आदी यावेळी उपस्थित होते.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सुनिल शेळके, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या वतीने मावळ तालुक्‍यामध्ये स्वागत करण्यात आले. तळेगाव येथील सुशिला मंगल कार्यालय येथे मार्गदर्शन सभा झाली. राष्ट्रनिर्माणचे अध्यक्ष सुरेश चव्हाणके यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी हम दो, हमारे दो, सबके दो दो असा संदेश दिला.

मुख्य संयोजक एस. पी. सिन्हा, सहसंयोजक त्यागी, राष्ट्रकवी डॉ. मदन मार्तंड, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, पश्‍चिम महाराष्ट्र बजरंग दलाचे प्रमुख संतोष भेगडे, नगरसेवक संदीप शेळके, अमोल शेटे, नगरसेविका शोभा भेगडे, प्राची हेंद्रे, शोभा परदेशी, रजनी ठाकुर, लक्ष्मण माने, सुनिल गायकवाड, संजय बाविस्कर यावेळी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)