देहुरोड कॅन्टोमेंट बोर्डाच्या “सीईओं’ना डेंग्यूची लागण

देहुरोड – देहूरोड कॅन्टोंन्मेट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अभिजित सानप यांना डेंग्यू झाल्याने येथील आधार रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

देहुरोड कॅन्टोंन्मेट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप यांना डेंगु झाल्याने उपचारार्थ येथील आधार रूग्णालयात गुरूवारी (दि. 26) रात्री दाखल करण्यात आले. सानप यांच्यावर एडिस एजिसाय जातीचा डास चावल्याने डेंगीचा आजार होतो, असे डॉ. गणेश राऊत यांनी सांगितले.

बोर्ड कार्यलयाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये “सीईओ’ यांचे निवासस्थान आहे. या इमारतीच्या मागे आणि समोर, तर प्रवेशद्वारा समोरील लष्करी जागेवर सुमारे दीड करोड रूपये खर्चून सिमेंट कॉंक्रीटीकरण (पीसीसी) करण्यात आले असून, सुमारे साठ वर्ष जुन्या (इमारत) निवासस्थानावर चाळीस लाख खर्च करण्यात आले आहेत. तर स्वच्छता अभियानांतर्गत शहर परिसरात स्वच्छतेसाठी सुमारे सहा कोटींच्या जवळपास खर्च करण्यात आले.

“सीईओं’च्या निवासस्थानाच्या परिसरात डासांचा प्रादुभाव आहे का ? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अवाढव्य खर्च करून “सीईओ’चे निवासस्थान असुरक्षित असेल, तर सुमारे 17 झोपडपट्‌ट्‌टया असणाऱ्या (स्लम एरीया) वसाहती आणि शहराचे काय ? असा सवाल शहरवासी करू लागले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)