देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्ड बैठकीत विविध कामे मंजूर

देहुरोड, (वार्ताहर) – कॅंटोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत मिळकत करांसह विविध कर वसुलीसाठी न्यायालयामार्फत नोटीस देवून कर वसुली व जप्तीबाबत कारवाई करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आरोग्य अधीक्षक पद निर्माण करण्यास तसेच संरक्षण विभागाच्या दिल्लीतील वरिष्ठ कार्यालयाचे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे कंत्राटी पद्धतीने विविध पदावर भरती केलेल्या कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन या तत्वाने सहा महिन्यांसाठी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.

कॅंटोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर ओ. पी. वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप, लेप्टनंट कर्नल राजीव लोध, सदस्य रघुवीर शेलार, सारिका नाईकनवरे, हाजीमलंग मारीमुत्तू, गोपाळराव तंतरपाळे, ललित बालघरे, ऍड. अरुणा पिंजण, अधीक्षक, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बैठकीत भूमिगत गटार योजना व नियोजित रुग्णालय बांधण्याच्या कामांच्या, नकाशाच्या कामासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्याच्या कामास मान्यता देण्यात आली. भाजी मंडई जवळील जुनी झालेली दुकाने पाडण्याचा प्रस्ताव मंजूर झालेला असताना अडथळे येत असल्याने संबंधितांना अंतीम मुदत देऊन त्यानंतर कारवाई करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. रसवंती केंद्रे चार ठिकाणी सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. संबंधीत जागांच्या लिलावातून बोर्डाला तीन लाख एकतीस हजार उत्पन्न मिळणार आहे.

जानेवारी महिन्यात लायन्स क्‍लबच्या सहकार्याने मिनी मॅरेथॉन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मॅरेथॉन स्पर्धेच्या वेळी विद्यार्थ्याची सुरक्षिततेची काळजी घ्यावी, अशी सूचना अध्यक्ष वैष्णव यांनी केली. रुग्णालयात मधुमेहींसाठी वैद्यकीय तज्ज्ञ नेमण्यास मान्यता देण्यात आली.

मुख्य कार्यकारी अधिकारी सानप यांनी त्यांच्या अधिकारात भांडार विभागामार्फत रुग्णालयासाठी खरेदी केलेल्या 6 लाख 62 हजार 606 रुपयांच्या देयकांस मान्यता देण्यात आली. दोन गाड्यांच्या बांधणीसही मान्यता देण्यात आली आहे.
चिंचोली येथील बचत गटाच्या महिलांनी शौचालयांची झालेली दूरवस्था निदर्शनास आणली होती. त्यानुसार चिंचोलीतील जाधव आळीसह शेलारवाडी व देहुरोड येथील स्वच्छतागृहे पडून त्या ठिकाणी नवीन स्वच्छतागृहे बांधण्यास मान्यता देण्यात आली आहे.

गोपाळराव तंतरपाळे यांनी कामगारांच्या 234 रिक्‍त जागा भरण्याची मागणी केली, तर हाजीमलंग मारीमुतू यांनी कंत्राटी कामगार भरती करताना स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी केली. सारिका नाईकनवरे यांनी मामुर्डी शाळेला मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी केली. रघुवीर शेलार यांनी घोरवडेश्‍वर डोंगरावर पथदिवे व्यवस्था करण्याबाबत केलेल्या मागणीस मान्यता देण्यात आली असून तूर्त पंधरा खांब बसवण्यास मान्यता दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)